मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाढले पाण्याचे टप्पे...

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी मोठी गळती सुरू असून दुरुस्तीसाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून १० तासांचा शट डाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यापूर्वीच गुरुवारी (दि. ७) दुपारी जायकवाडीत व सायंकाळी फारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळ याच जलवाहिनीला भगदाड पडले. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीसाठी शटडाऊन सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. त्यामुळे आता पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे गेल्याने शहरात जलसंकट निर्माण झाले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि.मी. आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्यातून पाण्याचा दाब थोडाही वाढला की त्यांना भगदाड पडत आहे. त्यामुळे शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम
मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. हे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला या जुन्या जलवाहिन्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. या दोन्ही जुन्या जलवाहिन्यांपैकी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर जायकवाडी ते नक्षत्रवाडी यादरम्यान काही ठिकाणी मोठी गळती सुरू आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून दहा तासांचा शटडाऊन घेण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले होते. परंतु, त्यापूर्वीच जायकवाडी धरणापासून काही अंतरावर
मनपा पाणीपुरवठा विभागाची दिलगिरी
शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्यांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी सायंकाळी महापालिकेने सुरू केले. यामुळे गुरुवारी सायंकाळचे पाण्याचे टप्पे आणि शुक्रवारी दिवसभर होणारे पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत. नागरिकांच्या या गैरसोयीबद्दल महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
असलेल्या जायकवाडी कॉलनीतून जाणाऱ्या १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला भगदाड पडल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाला मिळाली. त्यामुळे जायकवाडीतून पंप बंद करून पाणीपुरवठा थांबविण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions